मानकबाई पटेल यांना पेन्शन सुरू करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी):  येवल्याचे मनीलाल लालदास पटेल व श्रीराम मोगल शिंपी या दोघांनी बाल वयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चलेजाव चळवळी सक्रिय भाग घेतला होता.

त्यामुळे त्यांना ४१ दिवस तुरुंगवास भोगला होता. बाल वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकाबद्दल शासनाला अभिमान आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची शासन दक्षता घेते श्रीराम मोगल शिंपी यांना महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यलढ्यातील पेन्शन दिली. परंतु मनीलाल पटेल यांना त्यांच्या हयातीत पेन्शन मिळाली नाही. 

पटेल यांची पेन्शन सुरू करण्यासंदर्भातील परिपूर्ण कागदपत्र संचिका मंत्रालयात आहे. अनेक स्वातंत्रसैनिकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीना २ जून २०१६ चा जीआर शितल करून पेन्शन सुरू केली. 

१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनानिमित्ताने मुख्यमंत्री संभाजीनगर येथे आले असता, त्यांना एका शिष्टमंडळाने भेटून मनीलाल पटेल यांच्या पत्नी वयोवृद्ध, थकलेल्या आजाराने त्रस्त झालेल्या मानकबाई पटेल यांना स्वातंत्र सैनिक पेन्शन सुरू करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात ते न्याय देतील अशी अपेक्षा आहे.